नाथषष्ठी यात्रेसाठी व्यापाऱ्यांना जागेसाठी आता फक्त १ हजार रुपये मोजावे लागणार : नगराध्यक्षा

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : नाथषष्ठी यात्रेसाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून येणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना यंदा पैठण नगर परीषद जागाभाडे पोटी फक्त एक हजार रुपये आकारणार असल्याची माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा  विद्या कावसनकर यांनी दिली आहे.

नाथषष्ठी यात्रेनिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई कावसनकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व समतीने विविध ठराव मंजूर करण्यात आले. दरवर्षी नाथषष्ठी यात्रेसाठी शेकडो लहान मोठे व्यापारी व्यवसायासाठी पैठण नगरीत येतात. मात्र गेल्या दहा वर्षापासून नगर पालिका प्रशासन या व्यापाऱ्यांकडून जागा भाडे पोटी चार ते पाच हजार रुपये घेत होते. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी पैठणच्या यात्रेकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे त्यांचा नाथषष्ठी यात्रेवर मोठा परीणाम होत होता.

यंदा मोठ्या संख्येने राज्यभरातील व्यापारी नाथषष्ठी व्यवसायासाठी यात्रेतआला पाहिजे यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई कावसनकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष यांच्या निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर दिव्यागांना पैठण नगर
परीषदेच्या वतीने वर्षाला दिड हजार रुपये मानधन दिले जात होते.

त्यात पाचशे रुपयाची वाढ करण्यात आली असून आता येथून पुढे दिव्यागांना वर्षाला दोन हजार रुपये मानधन देण्याचा ठराव बैठकीत मंजुर करण्यात आला आहे. यंदा नाथषष्ठी यात्रा काळात आमदार विलास सुमारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांना सर्व सुविधा देण्यासाठी पैठण नगर परीषद कमी पडणार नाही असे नगराध्यक्षा विद्याताई कावसनकर यांनी सांगितले. या बैठकीत सर्व नगरसेवक उपस्थित होते.